सोलापूर : वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाचा ठेका देताना दबाव
सोलापूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.) : जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनासाठी दीड वर्षांपूर्वी नियुक्त केलेल्या एस. एस. सर्व्हिसेस कंपनीच्या विरोधात आलेल्या तक्रारीवरून शासनाने अहवाल मागविला आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतीच महापालिकेत बैठक झाली. या बैठकीत तत्काली
smc


सोलापूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.) : जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनासाठी दीड वर्षांपूर्वी नियुक्त केलेल्या एस. एस. सर्व्हिसेस कंपनीच्या विरोधात आलेल्या तक्रारीवरून शासनाने अहवाल मागविला आहे. त्या पार्श्वभूमीवर नुकतीच महापालिकेत बैठक झाली. या बैठकीत तत्कालीन आरोग्याधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी निविदा प्रक्रियेत सहभागी निविदाधारकांच्या कागदपत्रांची छाननी करण्यापासून ते पात्र निविदाधारकाला कामाचा आदेश देण्यापर्यंतची कार्यवाही आपण केली आहे. अत्यंत दबावाच्या वातावरणात ही प्रक्रिया केल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. तत्कालीन आरोग्याधिकाऱ्यांच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कोणाच्या दबावापोटी एस. एस. सर्व्हिसेसला हा ठेका दिला? यामध्ये राजकीय नेते, अधिकारी आहे की आणखी कोण सहभागी आहे? अशी चर्चा महापालिकेत रंगली आहे. महापालिकेने जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून रॉयल्टी भरण्यावरून वाद सुरू आहे. अधिकाऱ्यांकडून मक्तेदाराला पाठीशी घालण्यात येत असल्याने महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande