नाशिक : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी समर्थ गुरुपीठाकडून 11 लाखांचा धनादेश
नाशिक, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि श्री स्वामी समर्थ गुरुपीठाकडून गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे यांचे आदेशान्वये सेवेकरी परिवाराच्या वतीने गुरुपीठाचे महाव्यवस्थापक चंद्रकांत दादा मोरे यांनी अकरा लाख रुपयांचा धन
समर्थ गुरुपीठाच्या वतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 11 लाख रुपयेचा धनादेश


नाशिक, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि श्री स्वामी समर्थ गुरुपीठाकडून गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे यांचे आदेशान्वये सेवेकरी परिवाराच्या वतीने गुरुपीठाचे महाव्यवस्थापक चंद्रकांत दादा मोरे यांनी अकरा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द केला. नाशिक विभाग धर्मदाय सह आयुक्त कार्यालयात विभागीय सह आयुक्त विवेक सोनुने यांनी हा धनादेश स्वीकारला.

याप्रसंगी धर्मदाय सह आयुक्त महावीर जोगी, उप आयुक्त प्रणिता श्रीनिवार, सहाय्यक आयुक्त मातोळे पोरे हे उपस्थित होते.सप्टेंबर मध्ये राज्यभर विशेषतः मराठवाड्यात अतिवृष्टी आणि महापूर, जलप्रलयाच्या महारिष्टाने थैमान घालून शेतकऱ्यांस, सामान्य नागरिकांस उध्वस्त केले. या भयानक संकटात आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी उभं राहण्याचा आदेश पू अण्णासाहेब मोरे यांनी देताच सेवेकऱ्यांनी गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे बैठक घेऊन ही 11 लाखांची मदत तात्काळ देण्याचे ठरवले.

हा धनादेश देतांना उपस्थित अधिकाऱ्यांना माहिती देतांना चंद्रकांतदादा मोरे म्हणाले की, या अत्यंत आणीबाणी प्रसंगी फक्त एक धनादेश देऊनच सेवेकरी थांबणार नाहीत तर. आपत्तीग्रस्त गावागावात जाऊन प्रत्यक्ष मदत शेकडो सेवेकरी करीत आहेत. पाचोरा, सोयगाव, जालना जिल्ह्यातील घाणसांगवी तालुक्यातील गुंज, भादली, शिवणगाव, राजातटाकळी, परतूर मधील गोळेगावसह, सोलापूर मधील करमाळा,वाघोली -पुणे येथे सेवेकऱ्यांनी मदतीचा हात दिला.

किराणा, धान्य, वस्त्र, जीवनावश्यक वस्तू वाटप केले. 12 ते 15 ऑक्टोबर दरम्यान परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर, बीड जिल्ह्यात सेवेकरी मोठया प्रमाणात सेवा अभियान हाती घेऊन या संकटात धावून जाणार आहेत.स्वतः गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे, चंद्रकांतदादा, नितीन भाऊ, आबासाहेब मोरे मराठवाड्यात जाऊन शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी दौरे करीत आहेत.मेळावे घेऊन प्रत्यक्ष मदत यानिमित्त केली जाणार आहे.यावेळी ज्येष्ठ सेवेकरी नारायण काकड , केशव घोडेराव, बाजीराव सोनवणे,रवींद्र कहाणे, मधुकर बारसे व अन्य उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande