सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महर्षि वाल्मिकी यांची जयंती संपन्न
पुणे, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रामायणाचे रचयिते महर्षि वाल्मिकी यांची जयंती संपन्न झाली. कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी आणि प्र - कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. व
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महर्षि वाल्मिकी यांची जयंती संपन्न


पुणे, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रामायणाचे रचयिते महर्षि वाल्मिकी यांची जयंती संपन्न झाली. कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी आणि प्र - कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी मा. प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, वित्त व लेखाधिकारी सीएमए चारुशीला गायके, अधिसभा सदस्य कृष्णाजी भंडलकर, सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे, शिवाजी उतेकर आदी मान्यवर तसेच विद्यापीठ कर्मचारी संघाचे सचिव संतोष मदने, अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेसचे नंदू वाडिया, अध्यक्ष अशोक तुंडलायत, उपाध्यक्ष जितेंद्र उठेवाल आणि अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेसच्या विद्यापीठ शाखेचे सल्लागार किशोर भगत, नितीन प्रसाद, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande