रत्नागिरी, 7 ऑक्टोबर, (हिं. स.) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा परिषद आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या विद्यमाने
बुधवारी, दि. ८ ऑक्टोबर रोजी दिव्यांग मुले शोध व तपासणी मोहीम जिल्हा शासकीय रुग्णालयात राबविण्यात येणार आहे.बुधवारी सकाळी 10 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयातील जिल्हा शीघ्र निदान केंद्र येथे हा उपक्रम होणार आहे.प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र प्रकल्प संचालक एस. डी. पाथरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी