अमरावती - व्ही.एम.व्ही कॉलेजमध्ये परीक्षा फॉर्म प्रक्रियेतील गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार 
अमरावती, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) - शासकीय विदर्भ ज्ञान संस्था महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मागील वर्षभरापासून परीक्षा फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत सातत्याने येणाऱ्या अडचणींविरोधात आवाज उठवला आहे. वेळापत्रकाच्या अभावामुळे आणि ऑनलाइन प्रणाली उपलब्ध नसल
व्ही.एम.व्ही कॉलेज मध्ये परीक्षा फॉर्म प्रक्रियेतील गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार   परीक्षा फॉर्म,सह इतर विषयांकडे कॉलेज प्रशासनाने लक्ष देण्याची गरज


व्ही.एम.व्ही कॉलेज मध्ये परीक्षा फॉर्म प्रक्रियेतील गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार   परीक्षा फॉर्म,सह इतर विषयांकडे कॉलेज प्रशासनाने लक्ष देण्याची गरज


अमरावती, 7 ऑक्टोबर, (हिं.स.) - शासकीय विदर्भ ज्ञान संस्था महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मागील वर्षभरापासून परीक्षा फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत सातत्याने येणाऱ्या अडचणींविरोधात आवाज उठवला आहे. वेळापत्रकाच्या अभावामुळे आणि ऑनलाइन प्रणाली उपलब्ध नसल्यामुळे होत असलेल्या गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतल्याने काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात यापूर्वी तीन वेळा लेखी अर्ज सादर केले होते, परंतु कोणतीही ठोस कृती न झाल्यामुळे आज ७ ऑक्टोबर रोजी कॉलेजच्या प्रवेशद्वारावर बसून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

परीक्षा वेळापत्रक आधीच व निश्चित स्वरूपात जाहीर करणे, परीक्षा फॉर्म व शुल्क भरण्यासाठी सक्षम ऑनलाइन पोर्टल,सर्व प्रक्रियांचे वेळेवर व पारदर्शक संवाद या प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांच्या आहेत मात्र कॉलेज प्रशासन सातत्याने या कडे दुर्लक्ष करते त्यामुळे विद्यार्थ्यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला असता कॉलेज चे प्रोफेसर शिवानंद कुमार यांनी विद्यार्थ्यांसोबत वाद घालत टीसी काढून चालते व्हा! असे म्हणत एका विधयार्थ्याचा मोबाईल हिसकावून घेतला.त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी व प्रोफेसर यांच्यात चांगलाच वाद झाला.

विद्यार्थ्यांनी आपले निवेदन महाविद्यालय प्रशासन, जिल्हाधिकारी, गाडगे नगर पोलीस स्टेशन तसेच संयुक्त संचालक, उच्च शिक्षण विभाग यांना सादर केले आहे.विद्यार्थ्यांनी हे आंदोलन शांततेच्या मार्गाने राबवण्याचा निर्णय घेतलेला असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande