‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’चा संदेश — युवकांनी नेहुली क्रीडा संकुल परिसर केला स्वच्छ
रायगड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त “स्वच्छ भारत, सुंदर भारत” या संकल्पनेला उजाळा देत नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. ‘मेरा युवा भारत’ (माय भारत), युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय,
‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’चा संदेश — युवकांनी नेहुली क्रीडा संकुल परिसर केला स्वच्छ


रायगड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त “स्वच्छ भारत, सुंदर भारत” या संकल्पनेला उजाळा देत नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. ‘मेरा युवा भारत’ (माय भारत), युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने रायगड-अलिबाग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, प्रिझम सामाजिक विकास संस्था आणि स्पर्धा विश्व अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली.

जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ही स्वच्छता मोहीम सुरू झाली. युवक-युवतींनी उत्साहाने सहभाग घेत परिसरातील कचरा साफ करून परिसर स्वच्छ, नीटनेटका आणि आकर्षक बनविला. स्वच्छतेचे महत्त्व जनमानसात रुजविणे आणि समाजात स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

या प्रसंगी प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा भारत सरकारकडून राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित तपस्वी गोंधळी उपस्थित होत्या. त्यांनी सांगितले की, “गांधीजींचे स्वच्छतेवरील विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे. युवकांनी समाजपरिवर्तनाचे शिल्पकार बनावे.”मोहीमेत प्रिझम संस्थेचे कार्यकर्ते, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे अधिकारी, तसेच स्पर्धा विश्व अकॅडमीचे विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग घेतला. परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत युवकांच्या सहभागाचे स्वागत केले. या स्वच्छता मोहिमेद्वारे ‘स्वच्छ भारत अभियान’च्या उद्दिष्टांना बळ मिळाले असून युवकांनी पुढाकार घेऊन समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande