शासकीय आश्रमशाळांमध्ये जूनपासून शिक्षकच नाहीत
सुरगाणा, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रातील एकुण ४९९ आश्रम शाळा या दरवर्षी रोजनंदारी शिक्षकांवर चालतात, मात्र या वर्षी सुरु झालेल्या शैक्षणिक सत्रात सदर शाळांमध्ये रोजंदारी शिक्षकांना शासनाने नि
शासकीय आश्रमशाळांमध्ये जूनपासून शिक्षकच नाहीत


सुरगाणा, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रातील एकुण ४९९ आश्रम शाळा या दरवर्षी रोजनंदारी शिक्षकांवर चालतात, मात्र या वर्षी सुरु झालेल्या शैक्षणिक सत्रात सदर शाळांमध्ये रोजंदारी शिक्षकांना शासनाने नियुक्ती संदर्भात कोणताही आदेश न दिल्याने, रोजंदारी शिक्षक हे जून महिन्यापासून आदिवासी विकास भवन नाशिक येथे उपोषणाला बसले असून, या शिक्षकांना आदेश न दिल्यामुळे महाराष्ट्रातील आश्रम शाळांमध्ये अनेक विषयांचे शिक्षकच नसल्याने त्यांचा अभ्यासक्रम कोणत्याही प्रकारे पूर्ण झालेला नसताना, विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरू झालेल्या आहेत.

शासकीय आश्रमशाळांमध्ये जून महिन्यापासून नियमित किंवा रोजंदारी शिक्षक नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालेले नाही. तरी ही आता सहामाही परीक्षा घेण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे.

अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सुद्धा नीट शिकवला गेलेले नाहीत, वर्गात मार्गदर्शन करणारे शिक्षक नाहीत, तरी परीक्षा द्यायची अशी वेळ आल्याने विद्यार्थ्यांसह पालक संभ्रमात पडलेले आहेत. आता विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवायच्या कशा?” असा प्रश्न पालकांना पडलेला आहे?

शासनाने रोजंदारी शिक्षकांऐवजी बाह्यस्रोता द्वारे भरण्याचा निर्णय घेतला मात्र या माध्यमातून काम करण्यास अतिशय कमी प्रतिसाद मिळाल्याने शाळांमध्ये शिक्षकच आले नाहीत, अनेक वर्गांना शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे, मात्र महाराष्ट्रातील आश्रमशाळांमधील ही परिस्थिती प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.

-

प्रतिक्रिया -

गरीब गरजू आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आम्ही सेवाभावनेने आत्याल्प मानधनावर मागील अनेक वर्षापासून रोजंदारी शिक्षक म्हणून आश्रम शाळांमध्ये सेवा देत आहोत, मात्र यावर्षी शासनाने कोणताही आदेश न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाणार आहे, यात शासनाची उदासीनता दिसून येत आहे, विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा या उद्यापासून सुरू होत असून, किमान आता तरी याकडे शासनाने लक्ष घालून रोजंदारी शिक्षकांना नियुक्ती आदेश द्यावेत .

-राहूल जाधव

उपाध्यक्ष शासकिय आश्रम शाळा वर्ग तीन वर्ग चार संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande