छत्रपती संभाजीनगर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अमोल जाधव व राणी ताई बारकुल यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे
अमोल जाधव व राणी ताई बारकुल यांनी शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे , खासदार ओम राजे निंबाळकर,आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली.
ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी, कर्जमाफी करावी, पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा या त्यांच्या मागण्या तात्काळ सरकारने मान्य कराव्यात..! अशा मागण्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis