लातूर येथे मुख्याध्यापक, प्राचार्यांसाठी 8 ऑक्टोबर रोजी ‘जागर योजनांचा’ कार्यशाळा
लातूर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालय आणि लातूर जिल्हा खाजगी मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्र
लातूर येथे मुख्याध्यापक, प्राचार्यांसाठी 8 ऑक्टोबर रोजी ‘जागर योजनांचा’ कार्यशाळा


लातूर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालय आणि लातूर जिल्हा खाजगी मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांसाठी एकदिवसीय ‘जागर योजनांचा’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, 8 ऑक्टोबर 2025 रोजी दयानंद सभागृह, लातूर येथे दुपारी 12 वाजता ही कार्यशाळा होईल.

कार्यशाळेचे उद्घाटन लातूरच्या जिल्हाधिकारी तथा उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम नियामक परिषदेच्या अध्यक्षा वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे लातूर विभागीय अध्यक्ष सुधाकर तेलंग, लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. दत्तात्रय मठपती, लातूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मारुती सलगर आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नागनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमधील मुख्याध्यापक व प्राचार्यांना व्हावी आणि या योजना प्रत्येक शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने हे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक आणि प्राचार्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे आणि लातूर जिल्हा खाजगी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande