सोलापूर, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। तक्रारी अर्जानंतर पडताळणी झाली आणि अंबेजोगाई (जि. बीड) व तामलवाडी (जि. धाराशिव) येथील दोघांनी होनसळ (ता. उत्तर सोलापूर) ग्रामपंचायतीकडून नमुना क्र. आठ व बोगस दाखला घेऊन सोलापूर उत्तरच्या सह दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीची खरेदी दिली. या प्रकरणी दोघांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सूरजसिंह उदयसिंह दिख्खत (रा. प्रशांत नगर, आंबेजागाई) व मयुरी ज्ञानेश्वर पाटील (रा. तामलवाडी, ता. तुळजापूर) या दोघांनी सह दुय्यम निबंधक कार्यालय सोलापूर उत्तर येथे एका जमिनीची खरेदी केली होती. या दस्तात बनावट कागदपत्रे जोडून फसवणूक झाल्यासंदर्भात जैनोद्दीन खुदुबुद्दीन शेख (रा. दत्तनगर, मोहोळ) यांनी तक्रारी अर्ज दिला होता. फिर्यादी भरत हरिभाऊ कडू यांनी अर्जाच्या अनुषंगाने चौकशी केली. या दस्तात होनसळ ग्रामपंचायतीचा नमुना क्र. आठ उतारा व बोगस दाखला जोडलेला दिसला. लिहून देणारे म्हणून दस्तात स्वाक्षरी करणारे दोघेही सोलापूर जिल्ह्यातील नसताना देखील त्यांनी बनावट दाखले जोडले होते ही बाब उघड झाली. ---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड