सोलापूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ व त्यानुसार तयार करण्यात आलेल्या जागांच्या आरक्षणाची पदधत व चक्रानुक्रम नियम, २०२५ अंतर्गत उत्तर सोलापूर पंचायत समिती क्षेत्रातील आरक्षित जागांची सोडत प्रक्रिया सोमवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पार पडणार आहे.
या सोडतीद्वारे अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,नागरिकांचा मागासवर्ग व त्यामधील स्त्रिया तसेच सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यात येणार आहेत. यासाठी विशेष सभा बहुउद्देशीय सभागृह,जुने जिल्हाधिकारी कार्यालय,सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे,अशी माहिती तहसिलदार उत्तर सोलापूर यांनी पत्रकाद्वारे दिली.
पंचायत समिती क्षेत्रातील ज्या रहिवाशांना सदर सभेस उपस्थित राहण्याची इच्छा आहे,त्यांनी दिलेल्या ठिकाणी व वेळेस उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड