सोलापूरच्या श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयाला क वरून अ दर्जा प्राप्त
सोलापूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। साेलापूरसह परिसरातील जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात नामवंत असलेल्या श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाला महाराष्ट्र शासनाकडून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा क वरून अ दर्जा प्राप्त झाला आहे, अशी माहिती आमदार
सोलापूरच्या श्री मार्कंडेय सहकारी रुग्णालयाला क वरून अ दर्जा प्राप्त


सोलापूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। साेलापूरसह परिसरातील जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात नामवंत असलेल्या श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाला महाराष्ट्र शासनाकडून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा क वरून अ दर्जा प्राप्त झाला आहे, अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली. श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाला यापूर्वी क दर्जा होता. परिणामी, या रुग्णालयात अनेक महत्त्वाच्या आजारांवर महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार करणे अशक्य होत होते. याबाबत श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात अधिक आजारांवर शासकीय योजनेतून उपचार मिळावेत, अशी मागणी हॉस्पिटल संचालक मंडळ व नागरिकांनी देवेंद्र कोठे यांच्याकडे केली होती. यानंतर कोठे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील सागर बंगल्यावर झालेले बैठकीत मागणी केली होती.यावेळी तत्कालीन फडणवीस यांनी याबाबत कोठे यांना मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. विधानसभा निवडणुकीनंतर आमदार कोठे यांनी सत्यनारायण बोल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन डॉ. माणिक गुर्रम, श्रीधर बोल्ली, विनायक कोंड्याल, मल्लिकार्जुन सरगम, गुरुशांत धुत्तरगावकर आदींना सोबत घेऊन वरळीतील जीवनदायी भवन येथे आयुष्यमान भारत-मिशन महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांची भेट घेऊन याबाबत पाठपुरावा केला. परिणामी, महाराष्ट्र शासनाने श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचा दर्जा क वरून अ केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande