बीड - कपिलधार वाडीत जमिनीला भेगा; सर्वेक्षण करण्याच्या सूचना
बीड, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)। पाली कपिलधारवाडी परिसरात निर्माण झालेल्या जमिनीतील भेगा व जमीन खचण्याच्या गंभीर भूगर्भीय परिस्थितीची पाहणी करून तहसीलदार यांना तात्काळ सखोल भूगर्भ सर्वेक्षण करण्याच्या सूचना खासदार बजरंग सोनवणे यांनी दिले. गावातील बाधित
अ


बीड, 8 ऑक्टोबर, (हिं.स.)।

पाली कपिलधारवाडी परिसरात निर्माण झालेल्या जमिनीतील भेगा व जमीन खचण्याच्या गंभीर भूगर्भीय परिस्थितीची पाहणी करून तहसीलदार यांना तात्काळ सखोल भूगर्भ सर्वेक्षण करण्याच्या सूचना खासदार बजरंग सोनवणे यांनी दिले.

गावातील बाधित नागरिकांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बाधित कुटुंबांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे आश्वासन दिले

कपिलधारवाडीत सध्या अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. भू-स्खलनाची भीती निर्माण झाली असून माळीण गावसारखी दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने तत्काळ याची दखल घेऊन कपिलधारवाडीचे पुनर्वसन करण्याची तातडीची आवश्यकता आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande