चंद्रपूर : विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालयासह सरदार पटेल महाविद्यालयाला ४ पुरस्कार
चंद्रपूर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। येथील सरदार पटेल महाविद्यालयाला गोंडवाना विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालयासह ४ पुरस्कार मिळाले आहेत. हे सर्व पुरस्कार नुकतेच गडचिरोली येथे विद्यापीठात वर्धापनदिनी समारंभात प्रदान करण्यात आले. गोंडवाना विद्यापीठा
विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालयासह सरदार पटेल महाविद्यालयाला ४ पुरस्कार..


चंद्रपूर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। येथील सरदार पटेल महाविद्यालयाला गोंडवाना विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालयासह ४ पुरस्कार मिळाले आहेत. हे सर्व पुरस्कार नुकतेच गडचिरोली येथे विद्यापीठात वर्धापनदिनी समारंभात प्रदान करण्यात आले.

गोंडवाना विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठस्तरीय उत्कृष्ठ महाविद्यालयाचा प्रथम पुरस्कार सरदार पटेल महाविद्यालयाला मिळाला आहे. हा पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांच्यासह चमूने गोंडवाना विद्यापीठाच्या चौदाव्या वर्धापनदिनी सोहळा कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठात नव्या सांस्कृतिक सभागृहात कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे व पद्मश्री चंद्रशेखर मेश्राम यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला.

एनएसएस समन्वयक डॉ. कुलदीप आर. गोंड यांना उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गोंडवाना विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन सर्वसाधारण विजेताचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देखील सरदार पटेल महाविद्यालयाला मिळाला. तृतीय श्रेणी गटात गोंडवाना विद्यापीठ द्वारा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून महाविद्यालयाचे विनोद चोपावार यांना सन्मानित करण्यात आले.

महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सतत सहयोग देणारे सर्वोदय शिक्षण मंडळ यांच्या सामूहिक प्रयत्नांची ही फलश्रुती असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांनी व्यक्त केले.

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande