लातूर, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।सहकारमहर्षी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब व लातूर ग्रामीण मतदार संघाचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख यांच्या सूचनेनुसार आज प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी गुढीपाडवा व दीपावली निमित्त प्रति सभासद 50 किलो साखर सवलतीच्या दरात प्रति किलो 25 रुपये प्रमाणे लोदगा गट कार्यालय येथे सभासदास साखर वाटप शुभारंभ करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य साखर संघाचे संचालक तथा रेणा साखर दिलीप नगरचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक आबासाहेबजी पाटील, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख,लोदगा चे चेअरमन शरद लिंबराज भोईबार ,स्वामी परमेश्वर पंचाप्पा, धनराज साहेबराव सगरे, पांडुरंग हरीबा जाधव आदींसह अनेक जण उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis