पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून ओंकार ग्रुपची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटीची मदत
बीड, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातील पिकांचे तसेच शेतीसंबंधित साधनसामग्रीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यां
अ


बीड, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतातील पिकांचे तसेच शेतीसंबंधित साधनसामग्रीचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि सामाजिक बांधिलकी जपत ओंकार ग्रुपने राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटी रूपयांची मदत दिली. पंकजाताई मुंडे व ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

मुंबई येथे मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे ही एक कोटीची मदत सुपूर्द करण्यात आली. पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, मंत्री दादा भुसे, श्रीमती यामिनी पाटील यांच्यासोबत ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रेपाटील, संचालिका रेखाताई बोत्रे पाटील व संचालक ओमराजे बोत्रे पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस रु. १ कोटींचे योगदान देऊन शेतकऱ्यांच्या संकट काळात मोलाची मदत केली.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande