परळी विकासाच्या कामासंदर्भात धनंजय मुंडेंची शिवेंद्र भोसलेंशी चर्चा
बीड, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम मंत्री,श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांनी चर्चा केली. राज्याचे सार्वजनिक
अ


बीड, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम मंत्री,श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांनी चर्चा केली.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी परळी वैद्यनाथ विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या अनुषंगाने चर्चा केली. राजेंनी संबंधित कामे प्राधान्याने करून विकासासाठी एकत्रितपणे निर्णय घेऊ, असा शब्द दिला आहे अशी माहिती आमदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande