जपान, अमेरिकासह ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर
स्टॉकहोम, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने आज, बुधवारी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकची घोषणा केली. या वर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार सुसुमु कितागावा (जपान), रिचर्ड रॉबसन (ऑस्ट्रेलिया) आणि ओमर एम. याघी (यूएसए) यांना ज
जपान, अमेरिकासह ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर


स्टॉकहोम, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने आज, बुधवारी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकची घोषणा केली. या वर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार सुसुमु कितागावा (जपान), रिचर्ड रॉबसन (ऑस्ट्रेलिया) आणि ओमर एम. याघी (यूएसए) यांना जाहीर झाला आहे.या प्रतिष्ठित शास्त्रज्ञांना “मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स” या क्षेत्रात त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.

मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स हे धातू (मेटल) आणि कार्बन-आधारित संयुगे (ऑर्गेनिक युनिट्स) यांच्यापासून बनवलेले असतात. यांचा उपयोग रासायनिक प्रक्रिया सुलभ करण्यात,विशिष्ट वायूंना अडकवून ठेवण्यात (जसे की हायड्रोजन किंवा मिथेन) आणि वातावरणातून कार्बन डायऑक्साइड काढून टाकण्यात केला जातो.या तिघांना नोबेल पुरस्काराचे संस्थापक अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त १० डिसेंबर रोजी स्टॉकहोम येथे आयोजित समारंभात अधिकृतरित्या हा पुरस्कार प्रदान केला जाईल. विजेत्याला ११ दशलक्ष स्वीडिश क्रोनर (₹१०.३ कोटी), एक सुवर्णपदक आणि एक प्रमाणपत्र मिळेल. ही बक्षीस रक्कम तिघांमध्ये विभागली जाईल.

1901 ते 2024 या काळात 116 वेळा रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे.एकूण 195 शास्त्रज्ञांनी हे पारितोषिक मिळवले आहे. अल्फ्रेड नोबेल हे एक श्रीमंत स्वीडिश उद्योजक आणि डायनामाइटचे शोधक होते. त्यांनीच नोबेल पुरस्कारांची स्थापना केली होती, जे आज जगातील सर्वात प्रतिष्ठित शास्त्रीय सन्मान मानले जातात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande