वॉशिंग्टन, 8 ऑक्टोबर (हिं.स.)।भारत-पाकिस्तान संघर्षानंतर अमेरिका आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक मजबूत होताना दिसत आहेत. अनेक वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्तुती केली आहे.तर पाक लष्करप्रमुख असीम मुनीर आणि ट्रम्प यांच्यात डिनर बैठकही झाली आहे आणि रेअर-अर्थ मिनरल्स (दुर्मिळ खनिजे) संदर्भातील एक विशेष करारही झाला आहे.याचं बक्षीस आता पाकिस्तानला मिळणार असून, अमेरिका लवकरच एआयएम -120 अॅडव्हान्स्ड मीडियम रेंज एअर-टू-एअर मिसाईल्स (एएमआरएएएम ) पाकिस्तानला देणार आहे. अमेरिकेच्या रक्षण विभागाच्या अधिकृत प्रेस रिलीजनुसार, या शस्त्रखरेदीच्या करारात पाकिस्तानचे नाव विदेशी सैनिकी खरेदीदारांच्या यादीत समाविष्ट आहे. एआयएम-120 एएमआरएएएम ही एक एअर-टू-एअर मिसाईल आहे, जी दुश्मनाचे विमान दूर अंतरावरून लक्ष्य करू शकते. ही मिसाईल प्रामुख्याने एफ-16 फाल्कन फायटर जेट्स वर बसवली जाते. पाकिस्तानने ही मिसाईल २०१९ च्या बालाकोट एअर स्ट्राईकनंतर भारताशी झालेल्या हवाई संघर्षात वापरली होती. सध्या पाकिस्तानी वायुसेनेकडे याचा सी 5 व्हर्जन आहे. परंतु, हा नवा करार सी8 आणि डी 3 वर्जनच्या उत्पादनासाठी आहे, जे पूर्वीपेक्षा अधिक रेंज आणि अचूकता देतात. एआयएम-120 डी -3 ही एएमआरएएएम कुटुंबातील सर्वात अत्याधुनिक व उच्च-तंत्रज्ञानाची मिसाईल आहे.या मिसाईल्सना दुश्मनाचे फायटर जेट्स आणि त्यांच्या येणाऱ्या मिसाईल्सना दूर अंतरावरून नष्ट करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. रक्षा विश्लेषकांचं म्हणणं आहे की, या मिसाईलमुळे पाकिस्तानच्या एफ-16 ताफ्याची क्षमता व अचूकता वाढेल आणि त्यामुळे पाकिस्तानी वायुसेना हवाई धोके अधिक प्रभावीपणे सामोरे जाऊ शकेल.पाकिस्तान दोन दशकांपासून जुने एआयएम-120सी-5 वर्जन वापरत आहे, जे त्यांना २०१० मध्ये F-16 ब्लॉक 52 विमानांसोबत मिळाले होते. दरम्यान, भारताने आपले हवाई दलाचे आधुनिकरण करण्यास सुरुवात केली, आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये एएमआरएएएमच्या नव्या पिढीच्या मिसाईल्ससाठी अस्वस्थता वाढली होती. आता हा नवा करार पाकिस्तानला अधिक सक्षम हवाई प्रतिकारशक्ती देऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode