शांघाय, ८ ऑक्टोबर (हिं.स.)थकवा आणि घोट्याच्या दुखापती असूनही नोवाक जोकोविचने जबरदस्त लवचिकता दाखवत स्पेनच्या जौमे मुनारचा ६-३, ५-७, ६-२ असा पराभव करून शांघाय मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
या विजयासह, ३८ वर्षीय सर्बियन स्टारने स्पर्धेत विक्रमी पाचवे जेतेपद जिंकण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे, तर अनेक अव्वल मानांकित टेनिसपटू आधीच बाहेर पडले आहेत.
निर्णायक सेटमध्ये जोकोविच थोड्या वेळासाठी अत्यंत थकलेल दिसला, ज्यामुळे असे वाटले की, तो सामना पूर्ण करू शकणार नाही. पण त्याने धाडस केले आणि तिसऱ्या सेटमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याला कडवी झुंज देत विजय मिळवला.
२४ वेळा ग्रँडस्लॅम विजेत्याने सुरुवात चांगली केली, चौथ्या गेममध्ये तो ब्रेक मारला, परंतु नेटकडे धावताना त्याचा डावा घोटा घसरल्याने त्याला लवकरच वैद्यकीय विश्रांती घ्यावी लागली. फिजिओथेरपिस्टकडून उपचार घेतल्यानंतर, त्याने सामना सुरू ठेवला आणि पाचवा गेम राखला.
दुसऱ्या सेट दरम्यान त्याला पुन्हा उपचार मिळाले आणि थकव्याची स्पष्ट चिन्हे दिसली. ४१ व्या क्रमांकावर असलेल्या मुनारने दुसऱ्या सेटच्या १२ व्या गेममध्ये जोकोविचच्या चुकीचा फायदा घेत सेट जिंकला.
जोकोविच कोर्टवर कोसळला आणि काही क्षण तिथेच पडून राहिला. पण त्याच्या संघाच्या मदतीने तो पुन्हा उभा राहिला. तिसऱ्या सेटमध्ये, त्याने पुनरागमन केले. आणि पहिल्या आणि सातव्या गेममध्ये ब्रेक मारून प्रेक्षकांना रोमांचित केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे