अकोला नगर परिषद व पंचायत आरक्षणाचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध
अकोला, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदांसाठी आरक्षणाचा प्रारूप आराखडा दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या निर्देशानु
P


अकोला, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।

जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदांसाठी आरक्षणाचा प्रारूप आराखडा दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सोडत पद्धतीने निश्चित करण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग व सर्वसाधारण (महिलांसह) प्रवर्गासाठी हे आरक्षण ठरविण्यात आले आहे.

प्रारूप आरक्षण अधिसूचना संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत कार्यालयांच्या सूचना फलकांवर, त्यांच्या संकेतस्थळांवर, तसेच जिल्हाधिकारी अकोला यांच्या अधिकृत संकेतस्थळावर (akola.nic.in) दि. ९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय, जिल्ह्यातील संबंधित तहसील कार्यालयांमध्येही ही अधिसूचना पाहण्यासाठी उपलब्ध आहे, अशी माहिती नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त विश्वनाथ वडजे यांनी दिली.

ज्या नागरिकांना या प्रारूप आरक्षणाबाबत हरकती किंवा सूचना सादर करायच्या असतील, त्यांनी दिनांक ९ ऑक्टोबर पासून १४ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत संबंधित नगरपरिषद/नगरपंचायत कार्यालयात लेखी स्वरूपात कारणासहीत सादर कराव्यात. या वेळेनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande