परभणी, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)।
जिंतूरमार्गे परभणीकडे जाणारा मालवाहू ट्रक (एमएच - २० जीझेड २५०४) बोरी जवळील नागापूर येथील महामार्गावरून करपरा नदीच्या पात्रात पडल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
संभाजीनगर येथील अशोक शिरसाट यांच्या मालकीचा मालवाहू ट्रक परभणीला जाण्यासाठी संभाजीनगर येथून निघाला होता. जिंतूर ते परभणी असा प्रवास करताना हा ट्रक मूळ महामार्गाचा रस्ता सोडून करपरा नदीच्या पात्रात पडला. याठिकाणी करपरा नदीवर पुलाचे काम चालू आहे.
महामार्गावरून पुलाकडे जाणारा जो रस्ता तयार करण्यात आला आहे. ,त्या रस्त्यावर कुठेही वाहनधारकांना सावधानतेचा इशारा असलेले फलक लावण्यात आलेले नाहीत. यामुळे ट्रकाचा चालक शेख हसीउद्दीन गोंधळून गेला आणि हा अपघात घडला असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis