अकोला शहरासाठी एकाच दिवशी 2 महत्वाच्या घोषणा
अकोला, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। अकोल्याच्या जनतेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. आमदार साजिद खान पठाण यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळत, आज अकोल्याला दोन महत्त्वपूर्ण घोषणा मिळाल्या श्री राजराजेश्वर संस्थान, अकोला यास ‘ब वर्ग तीर्थक्षेत्र’चा दर्जा आणि
अकोला शहरासाठी एकाच दिवशी 2 महत्वाच्या घोषणा


अकोला, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। अकोल्याच्या जनतेसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. आमदार साजिद खान पठाण यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळत, आज अकोल्याला दोन महत्त्वपूर्ण घोषणा मिळाल्या श्री राजराजेश्वर संस्थान, अकोला यास ‘ब वर्ग तीर्थक्षेत्र’चा दर्जा आणि अल्पसंख्याक मंत्री ऍड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ‘उर्दू घर’ स्थापनेची घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे अकोल्यात हिंदू - मुस्लिम समाजाच्या ऐक्याचे प्रतीक एकप्रकारे राज्य सरकारच्या घोषणेतून दिसून आले आहे.

या दोन्ही निर्णयांमुळे अकोल्यातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक ऐक्याला नवी दिशा मिळणार आहे. आमदार साजिद खान पठाण यांच्या जनसेवेतील सातत्य, लोकहितासाठीची निष्ठा आणि विकासासाठीचे योगदान यांचेच हे फलित आहे. तर आ. पठाण यांनी निवडून आल्यावर सर्वप्रथम राजेश्वर मंदिराला 'ब' वर्ग दर्जा देण्यात यावा अशी मागणी लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडली होती. त्यासाठी वारंवार त्यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. मागील काळात राजराजेश्वर मंदिराला 'क' वर्ग दर्जा देण्यात आला तेव्हा सुद्धा त्यांनी मंदिराला 'ब' वर्ग दर्जा देण्यात यावा अशी आग्रही मागणी केली होती. बुधवारी दिनांक ८ ऑक्टोबर रोजी राज्य शासनाने मागणी मंजूर करीत अखेर राजराजेश्वर मंदिराला 'ब' वर्ग दर्जा प्रदान करण्याचा शासननिर्णय काढला. तर यासोबतच मुस्लिम बहुल वस्ती असलेल्या या अकोला शहरात 'उर्दू' घराला सुद्धा मंजुरात दिली. एकाच दिवशी दोन्ही निर्णय घेत राज्य सरकारने अकोल्याला दोन मोठ्या सौगाती दिल्या असल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिक व्यक्त करीत आहे.

अकोल्याच्या जनतेने या दोन्ही घोषणांचे उत्स्फूर्त स्वागत करत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक मंत्री माणिकराव कोकाटे आणि आमदार साजिद खान पठाण यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande