अकोला : सरन्यायमूर्तींना संरक्षण द्यावे, काँग्रेसचे राष्ट्रपतींना पत्र
अकोला, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। सरन्यायमूर्ती भूषण गवई यांच्या जीवावर झालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) तर्फे अध्यक्ष अशोक अमानकर यांच्या नेतृत्वाखाली आज महामहिम राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाची प्र
अकोला : सरन्यायमूर्तींना संरक्षण द्यावे, काँग्रेसचे राष्ट्रपतींना पत्र


अकोला, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। सरन्यायमूर्ती भूषण गवई यांच्या जीवावर झालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण) तर्फे अध्यक्ष अशोक अमानकर यांच्या नेतृत्वाखाली आज महामहिम राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी अकोला यांना देण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयात कार्यरत असताना न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला हा केवळ एखाद्या व्यक्तीवर नव्हे, तर भारताच्या न्यायव्यवस्थेवर आणि लोकशाही व्यवस्थेवर झालेला हल्ला आहे. या घटनेमुळे संविधानिक मूल्यांना धक्का बसला असून, न्यायालयीन स्वातंत्र्य व लोकशाहीसाठी ही घटना अत्यंत धोकादायक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, न्यायालय परिसरात सुरक्षेची योग्य व्यवस्था वाढवावी, न्यायव्यवस्थेवर आधारित संविधानिक प्रतीकांवर झालेल्या हल्ल्यांविरुद्ध केंद्र सरकारने कडक पावले उचलावीत.

या निवेदनावर महेंद्र गवई, कपिल रावदेव,व विजय देशमुख,अतुल अमानकर, मधुसुदन भटकर, अनिल तायडे, वासनिक, आलमगीर खान, सुरेश ढाकुलकार , विजयकुमार राठोड, सुभाष वानखेडे, ताजुद्दीन खान, मौसुम खान, अजीज शेख, रेहान अहमद, रियाज अहमद, मुझिब खान, महोमद खान, कादर पटेल यांच्यासह जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande