बीड जिल्ह्याच्या अतिश तोडकर ला कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक
बीड, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मंगरूळ गावचा सुपुत्र पै.अतिश सुनील तोडकर याने ऑल इंडिया इंटर रेल्वे चॅम्पियनशिप, दिल्ली येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून गाव,तालुका आणि जिल्ह्याची मान उंचावली आहे. 61 किलो
अ


बीड, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मंगरूळ गावचा सुपुत्र पै.अतिश सुनील तोडकर याने ऑल इंडिया इंटर रेल्वे चॅम्पियनशिप, दिल्ली येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून गाव,तालुका आणि जिल्ह्याची मान उंचावली आहे.

61 किलो फ्री स्टाईल वजनगटात तो प्रथम आला असून ईशान्य रेल्वे कडून विजय पाटील विरुद्ध मध्य रेल्वे कडून अतिश या दोन मल्लांच्या झालेल्या कुस्ती मध्ये 5/8 गुणांकनाने अतिशने बाजी मारली.

या संदर्भात आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस म्हणाले की, या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande