चंद्रपूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961 मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, 2025 नुसार अनुसूचित जाती -अनुसूचित जमाती - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता सोडत पध्दतीने कार्यवाही करण्याकरिता 13 ऑक्टोबर रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.
असे आहे वेळापत्रक :1) जिल्हा परिषद चंद्रपूरची सभा नियोजन भवन येथे 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वा. 2) पं.स. चिमुरची सभा तहसील कार्यालय, चिमुर येथे 13 ऑक्टो. रोजी सकाळी 11 वा. 3) पं.स. नागभिडची सभा तहसिल कार्यालय, नागभिड येथे 13 ऑक्टो. दुपारी 3 वा. 4) पं.स. ब्रम्हपुरीची सभा तहसील कार्यालय, ब्रम्हपुरी येथे 13 ऑक्टो. सकाळी 11वा. 5) पं.स. सिंदेवाहीची सभा तहसिल कार्यालय, सिंदेवाही येथे 13 ऑक्टो. दुपारी 3 वा. 6) पं.स. भद्रावतीची सभा तहसिल कार्यालय, भद्रावती येथे 13 ऑक्टो. दुपारी 3 वा. 7) पं.स. वरोराची सभा पंचायत समिती कार्यालय, वरोरा येथे 13 ऑक्टो. सकाळी 11 वा. 8) पं.स. चंद्रपूरची सभा तहसिल कार्यालय, चंद्रपूर येथे 13 ऑक्टो. दुपारी 3 वा., 9) पं.स. मूलची सभा तहसिल कार्यालय, मुल येथे 13ऑक्टो. सकाळी 11 वा. 10) पं.स. सावलीची सभा तहसिल कार्यालय, सावली येथे 13 ऑक्टो. दुपारी 3 वा. 11) पं.स. पोंभुर्णाची सभा पंचायत समिती कार्यालय, पोंभुर्णा येथे 13 ऑक्टो.दुपारी 3 वा. 12) पं.स. गोंडपिपरीची सभा पंचायत समिती कार्यालय, गोंडपिपरी येथे 13 ऑक्टो. सकाळी 11वा. 13) पं.स. बल्लारपुरची सभा उपविभागीय अधिकारी कार्यालय, बल्लारपुर येथे 13 ऑक्टो., सकाळी 11 वा. 14) पं.स. कोरपनाची सभा तहसील कार्यालय कोरपना, येथे 13 ऑक्टो. दुपारी 3 वा. 15) पं.स. जिवतीची सभा पंचायत समिती कार्यालय, जिवती येथे 13 ऑक्टो. सकाळी 11 वा. आणि 16) पं.स. राजुराची सभा उपविभागीय अधिकारी कार्यालय, राजूरा येथे 13 ऑक्टो. रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.
जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या नागरिकांची सदर सभेस हजर राहण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील ठिकाणी व वेळी उपस्थित राहावे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव