नांदेड जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत १३ ऑक्टोबर रोजी
नांदेड, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड जिल्हा परिषद व तिच्या अंतर्गत असलेल्या १६ पंचायत समित्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सोमवार दिनां
नांदेड जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत १३ ऑक्टोबर रोजी


नांदेड, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। नांदेड जिल्हा परिषद व तिच्या अंतर्गत असलेल्या १६ पंचायत समित्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सोमवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी या सोडत जाहिर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रांनुक्रम नियम, २०२५ नुसार ही सोडत घेण्यात येत आहे.

या नियमांनुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखीव ठेवायच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखीव ठेवायच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता सोडत पध्दतीने विशेष सभा आयोजित केली आहे.

अ.क्र. जिल्हा परिषदेचे नाव/पंचायत समितीचे नाव सभेचे ठिकाण सभेची वेळ व तारीख

1 नांदेड जिल्हा परिषद, नांदेड सभागृह, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड सकाळी-11 वा. दिनांक 13/10/2025

2 पंचायत समिती, किनवट सभागृह, तहसिल कार्यालय, किनवट सकाळी-11. वा. दिनांक 13/10/2025

3 पंचायत समिती, माहुर कै. वसंतराव नाईक सभागृह, पंचायत समिती, माहुर दुपारी-3 वा. दिनांक 13/10/2025

4 पंचायत समिती, हदगांव पंचायत समिती सभागृह, तहसिल कार्यालय, हदगांव सकाळी-11. वा. दिनांक 13/10/2025

5 पंचायत समिती, हिमायतनगर सभागृह, तहसिल कार्यालय, हिमायतनगर दुपारी-3वा. दिनांक 13/10/2025

6 पंचायत समिती, नांदेड उपविभागीय अधिकारी, नांदेड यांचे बैठक कक्ष, दुसरा मजला, तहसिल कार्यालय, नांदेड सकाळी-11.00 वा. दिनांक 13/10/2025

7 पंचायत समिती, अर्धापूर सभागृह, तहसिल कार्यालय, अर्धापूर दुपारी-3. वा. दिनांक 13/10/2025

8 पंचायत समिती, भोकर उपविभागीय अधिकारी, भोकर यांचे बैठक कक्ष, दुसरा मजला, तहसिल कार्यालय, भोकर सकाळी-11.00 वा. दिनांक 13/10/2025

9 पंचायत समिती, मुदखेड सभागृह, तहसिल कार्यालय, मुदखेड दुपारी-3.वा. दिनांक 13/10/2025

10 पंचायत समिती, धर्माबाद बैठक कक्ष, उपविभागीय अधिकारी कार्यालय, धर्माबाद सकाळी-11वा. दिनांक 13/10/2025

11 पंचायत समिती, उमरी तहसिल सभागृह (नवीन), तहसिल कार्यालय, उमरी दुपारी-3वा. दिनांक 13/10/2025

12 पंचायत समिती, बिलोली पंचायत समिती सभागृह, बिलोली ता. बिलोली सकाळी-11 वा. दिनांक 13/10/2025

13 पंचायत समिती, नायगांव खै. तहसिल कार्यालय, नायगाव खै. दुपारी-3वा. दिनांक 13/10/2025

14 पंचायत समिती, कंधार सभागृह, तळमजला, तहसिल कार्यालय, कंधार सकाळी-11 वा. दिनांक 13/10/2025

15 पंचायत समिती, लोहा तहसिल कार्यालय, लोहा दुपारी-3 वा. दिनांक 13/10/2025

16 पंचायत समिती, देगलूर पंचायत समिती सभागृह, तहसिल कार्यालय, देगलूर सकाळी-11 वा. दिनांक 13/10/2025

17 पंचायत समिती, मुखेड बैठक कक्ष, तहसिल कार्यालय, मुखेड दुपारी-3.वा. दिनांक 13/10/2025

याकरिता सोडत पद्धतीने कारवाई करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली असून, संबंधित अधिकारी, प्रतिनिधी आणि जनतेने या सोडतीला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande