संविधान जाणीवजागृती उपक्रमांचे आयोजन करा - जिल्हाधिकारी स्वामी
छत्रपती संभाजीनगर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। संविधानाविषयी विद्यार्थीदशेपासूनच ज्ञान व्हावे यासाठी संविधान जाणीव जागृती उपक्रमांचे आयोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत दिले. जिल्हा दक्षता समितीची बै
अ


छत्रपती संभाजीनगर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। संविधानाविषयी विद्यार्थीदशेपासूनच ज्ञान व्हावे यासाठी संविधान जाणीव जागृती उपक्रमांचे आयोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत दिले.

जिल्हा दक्षता समितीची बैठक आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीसाठी सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, पोलीस उपायुक्त गौतम पातारे, सरकारी वकील मोना राऊत, पोलीस निरीक्षक राजेश घोळवे तसेच पोलीस निरीक्षक आशा भांडे आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाची माहिती घेऊन त्यात शिक्षा झालेली प्रकरणे, निर्दोष प्रकरणे याबाबत पोलीस विभागांशी चर्चा करून प्रकरण निकाली काढावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी बैठकीत दिले. याच कायद्या अंतर्गत अर्थसाह्यासाठी प्रलंबित प्रकरणेही लवकरात लवकर निकाली काढावी,असेही निर्देश त्यांनी दिले.

सामाजिक न्याय विभाग अंतर्गत संविधानाची उद्देशिका प्रत्येक कार्यालयात लावण्याचा शासन निर्णय असून त्याची अंमलबजावणी करावी. संविधानाविषयी जाणीव जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करावे. विद्यार्थ्यांना याबाबत विविध उपक्रमांद्वारे माहिती द्यावी. दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यावर शाळेमध्ये हस्ताक्षर स्पर्धेच्या माध्यमातून संविधानाची उद्देशिका विद्यार्थ्यांच्या लेखनातून व त्यांच्या वाचनातून गेली पाहिजे. यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन शिक्षण विभागाच्या समन्वयाने करावे. सामाजिक सलोखा आणि एकात्मता अबाधित राहावी यासाठी सामाजिक न्याय विभाग, पोलीस प्रशासन आणि इतर विभागांनाही योग्य त्या खबरदारी घेऊन विविध कायद्यांच्या अंमलबजावणीकडे कटाक्षाने लक्ष द्यावे,असेही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande