त्रंबक रस्त्यावरील भूसंपादनाला शेतकरी ग्रामस्थांचा विरोध
त्र्यंबकेश्वर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी होऊ घातलेल्या नाशिक त्रंबक रस्त्याच्या भूसंपादनाला या परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे. नाशिक प्रदेश विकास प्राधिकरणाने दिलेली नोटिस चुकीची असून जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय करताना कुठ
त्रंबक रस्त्यावरील भूसंपादनाला शेतकरी ग्रामस्थांचा विरोध कायदेशीर लढा देण्याचा निर्णय


त्र्यंबकेश्वर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी होऊ घातलेल्या नाशिक त्रंबक रस्त्याच्या भूसंपादनाला या परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे. नाशिक प्रदेश विकास प्राधिकरणाने दिलेली नोटिस चुकीची असून जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय करताना कुठलेही बांधकाम पाडू देणार नसल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

नाशिक त्रंबक रस्त्यावरील खंबाळे या ठिकाणी त्र्यंबकराज लॉन्स या ठिकाणी पिंपळगाव बहुला ते त्र्यंबकेश्वर पर्यंत सर्व शेतकरी ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्यासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये नाशिक त्र्यंबक या ठिकाणी होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावावरती नाशिक विकास प्राधिकरणाच्या वतीने पिंपळगाव बोला ते त्रंबकेश्वर या परिसरात असलेल्या दोन्ही बाजूचा रस्ता हा 30 मीटर पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या भागातील नागरिकांचे बांधकाम हे नाशिक विकास प्राधिकरणाने अतिक्रमण असल्याचे सांगून ते पाडण्याचा निर्णय घेतला आहे त्याबाबतची नोटीस शेतकऱ्यांना देण्यात आली. या सर्व प्रश्नावरती कायदेशीर मार्गाने लढण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. त्याचबरोबर या बैठकीत नाशिक विकास प्राधिकरणाच्या नोटीसला विरोधात न्यायालयीन लढाई लढण्याबरोबरच इतर सदस्य मार्गाने विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या बैठकीला शेकडो शेतकरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande