छत्रपती संभाजीनगर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदासाठी भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोफत पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. शासनाच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे हे मोफत प्रशिक्षण दि.३ ते १२ नोव्हेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
या कोर्सदरम्यान प्रशिक्षणार्थ्यांसाठी निवास, भोजन व प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी दि.३१ ऑक्टोंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवरून SSB – ६२ कोर्ससाठी प्रवेशपत्र व परिशिष्टांची प्रिंट घेऊन पूर्ण भरून आणणे आवश्यक आहे.पात्रता अटींपैकी कोणतीही एक आवश्यक –CDSE (UPSC) अथवा NDA (UPSC) परीक्षा पास होऊन SSB मुलाखतीस पात्रता, NCC ‘B’ ग्रेडसह गट मुख्यालयाकडून SSB साठी शिफारस, टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी SSB मुलाखतीचे कॉल लेटर, युनिव्हर्सिटी एंट्री स्कीमसाठी SSB कॉल लेटर किंवा शिफारस यादीतील नाव आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या training.petenashik@gmail.com या ई-मेलवर किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक 9156073306 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis