‘जीएसटीमध्ये झालेल्या सुधारणा‘ विषयावर शुक्रवारी बोरिवलीत कार्यशाळा
मुंबई, 9 ऑक्टोबर (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी दरात कपात करून सर्वसामान्य नागरिकांसाठी ऐतिहासिक निर्णय केला. सर्वसामान्य नागरिकांना जीएसटी २.० बद्दल अधिक माहिती मिळावी य
‘जीएसटीमध्ये झालेल्या सुधारणा‘ विषयावर शुक्रवारी बोरिवलीत कार्यशाळा


मुंबई, 9 ऑक्टोबर (हिं.स.) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी दरात कपात करून सर्वसामान्य नागरिकांसाठी ऐतिहासिक निर्णय केला. सर्वसामान्य नागरिकांना जीएसटी २.० बद्दल अधिक माहिती मिळावी यासाठी भाजपा मागाठाणे विधानसभेच्या उत्तर आणि मध्य मंडळातर्फे उद्या शुक्रवार, १० ऑक्टोबर रोजी भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांच्या विशेष उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेला सहकार भवन, फुलपाखरू उद्यान, टाटा पावर हाऊस, बोरिवली पूर्व येथे सायंकाळी ७.३० वाजता सुरुवात होणार आहे. या कार्यशाळेत मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपा प्रवक्ते गणेश खणकर, मा. मंडळ अध्यक्ष आप्पा बेलवणकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजक मागाठाणे उत्तर मंडळ अध्यक्ष अमित उतेकर, मध्य मंडळ अध्यक्षा सोनाली नखुरे आणि निमंत्रक वॉर्ड क्र. ११ चे वॉर्ड अध्यक्ष दीपक वर्तक, वॉर्ड क्र. १२ चे वॉर्ड अध्यक्ष गणेश ताटे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande