सेलू तालुक्यातील ग्रामीण भागात सिंगल फेज लाईन तात्काळ सुरू करण्याची मागणी
परभणी, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून सेलु तालुक्यातील ग्रामीण भागातील सिंगल फेज लाईन बंद आहे. वारंवार शेतकरी बांधव महावितरण कार्यालयात खेटे मारत आहेत. परंतु अधिकारी कसल्याही प्रकारची दाद देण्यास तयार नाहीत. महावितरण कार्यालयाचे या तु
सेलू तालुक्यातील ग्रामीण भागात सिंगल फेज लाईन तात्काळ सुरू करण्याची मागणी


परभणी, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून सेलु तालुक्यातील ग्रामीण भागातील सिंगल फेज लाईन बंद आहे. वारंवार शेतकरी बांधव महावितरण कार्यालयात खेटे मारत आहेत. परंतु अधिकारी कसल्याही प्रकारची दाद देण्यास तयार नाहीत. महावितरण कार्यालयाचे या तुधलकी कारभारामुळे शेतकरी वर्ग परेशान आहे.

आधीच निसर्गाच्या अवकृपेमुळे या वर्षी शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यात पुन्हा महावितरण कार्यालयाचे तुधलकी निर्णयामुळे शेतकरी वर्ग परेशान आहे. अतिवृष्टीच्या तडाखातुन वाचलेले सोयाबीन पिकाची काढणी सुरू आहे. त्यामुळे रात्री अपरात्री शेतात पिकाचे संरक्षणासाठी जावे लागते, जनावरे आखाड्यावर असतात.. त्यामुळे रात्रीचै अंधारात वन्य प्राणी पासुन संरक्षण ई साठी रात्रीच्या वेळी सिंगल फेज लाईन चालू असणे अत्यंत आवश्यक आहे.पण स्थानिक महावितरण अधिकारी वर्गाचे मनमानी व तुधलकी कारभारामुळे शेतकरी वर्ग परेशान आहे.

पुर्वीच्या काळी सिंगल फेज लाईन बारा तास चालू असे..

अतिवृष्टीच्या काळात बंद पडलेला वीज पुरवठा तात्काळ सुरू करा असे शासनाचे आदेश असताना येथील अधिकारी त्यास केराची टोपली दाखवली आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर असताना व सोयबीन पिक काढणे चालू असताना हे प्रकार चालू आहेत.. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ महावितरण अधिकारी यांना सेलू तालुक्यातील ग्रामीण भागातील सिंगल फेज लाईन बारा तास चालू ठेवण्याचा आदेश करावा अशी मागणी मा. उर्जा मंत्री यांच्याकडे करण्यात आली. या निवेदनावर श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ, देवराव दळवे, योगेश सुर्यवंशी, अजित मंडलीक, विकास गादेवार, गुलाब पौळ, सतिश काकडे, भाऊराव सोनवणे, दिलीप मगर, मुकूंद टेकाळे, भारत झाल्टे, दत्ता कांगणे, विठ्ठल काळे, परमेश्वर वीर आदींचे सह्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande