जळगाव, 9 ऑक्टोबर (हिं.स.)जळगाव सुवर्णपेठेत सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून, सोन्याच्या भावात एक हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २२ हजार ३०० रुपयांवर पोहोचले आहे. तसेच चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ५२ हजार ८०० रुपयांवर पोहोचली आहे. ३ ऑक्टोबर रोजीचा अपवाद वगळता सोने-चांदीच्या भावात सतत भाववाढ सुरू आहे. त्यामुळे सोने एक लाख २१ हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर त्यात पुन्हा एक हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख २२ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे, तर एक लाख ५१ हजार ३०० रुपयांवर पोहोचलेल्या चांदीच्या भावात पुन्हा एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ५२ हजार ८०० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर