रत्नागिरी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार मनुज जिंदल यांनी स्वीकारला
रत्नागिरी, 9 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. जिंदल यांचे स्वा
रत्नागिरी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार मनुज जिंदल यांचे स्वागत


रत्नागिरी, 9 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. जिंदल यांचे स्वागत केले. तसेच जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी लोकराज्य मासिकाचा अंक देऊन नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

कार्यभार स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेण्यास सुरुवात केली असून, प्रशासन अधिक कार्यक्षम आणि जनाभिमुख करण्यावर त्यांनी भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande