नांदेड, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन झाली श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येथे उत्साहात आयोजन करण्यात आले होतेकरण्यात आले होते देशाच्या युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजीत पवार आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. राज्यातील ५६० शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि तांत्रिक विद्यालयांमधून या अभ्यासक्रमांची एकाच वेळी सुरुवात करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर नांदेड येथील श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विश्वकर्मा श्री मारोती पांचाळ आणि श्री सिताराम जहांगीड यांच्या हस्ते आठ अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी आमदार बालाजी कल्याणकर, आयएमसी सदस्य हर्षद शहा, रामनाथ तप्तेवार, धीरज बिडवे, प्रेमानंद शिंदे, सहायक आयुक्त राजपाल कोल्हे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर. बी. गणविर, तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकपर भाषणात जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी गणविर यांनी अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. संस्थेचे प्राचार्य सचिन सुर्यवंशी यांनी राज्यसभा सदस्य व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेला शुभेच्छा संदेश वाचून दाखवला. आपल्या संदेशात श्री चव्हाण यांनी म्हटले की, “या अभ्यासक्रमांमुळे युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या पंतप्रधानांच्या संकल्पनेला बळ मिळेल.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. ए. पोतदार यांनी केले, तर आभार गटनिदेशक विकास भोसीकर यांनी मानले. कार्यक्रमात संस्था कर्मचारी, प्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थ्यांसह सुमारे १५०० जण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
— ---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis