गाझा शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कराराचे पंतप्रधान मोदींनी केले स्वागत
नवी दिल्ली , 9 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा करत माहिती दिली आहे की, इस्रायल आणि हमास गाझा शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी सहमत झाले आहेत. लवकरच हमास त्यांच्या ताब्यातील बंदींना मुक्त करेल, तर इस्रायल आप
गाझा शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यातील करार


नवी दिल्ली , 9 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा करत माहिती दिली आहे की, इस्रायल आणि हमास गाझा शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी सहमत झाले आहेत. लवकरच हमास त्यांच्या ताब्यातील बंदींना मुक्त करेल, तर इस्रायल आपली सेना एका ठराविक रेषेपर्यंत मागे घेईल.या पार्श्वभूमीवर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बातमीचं स्वागत केलं असून, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिलं, “आम्ही अध्यक्ष ट्रम्प यांच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर झालेल्या कराराचं स्वागत करतो. हा पंतप्रधान नेतन्याहू यांच्या मजबूत नेतृत्वाचा दाखला आहे. बंदींची मुक्तता आणि गाझातील लोकांसाठी वाढवली जाणारी मानवीय मदत त्यांना दिलासा देईल, आणि यामुळे स्थायी शांततेच्या दिशेने वाट मोकळी होईल, अशी आम्हाला आशा आहे.” एका अहवालानुसार, हमासच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, हमास 2,000 पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात 20 जिवंत बंदींची अदलाबदल करेल. या 2,000 पॅलेस्टिनी कैद्यांपैकी 250 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे आणि उर्वरित 1,700 कैद्यांना युद्ध सुरू झाल्यानंतर अटक करण्यात आली आहे.हा करार लागू झाल्यानंतर 72 तासांच्या आत ही अदलाबदल होणार असून यावर दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली आहे. या कराराअंतर्गत, इस्रायली सेना बंदींच्या अदलाबदलीनंतर मागे हटेल आणि एका “बफर झोन” मध्ये जाईल. याशिवाय, युद्धविरामाच्या पहिल्या पाच दिवसांमध्ये दररोज किमान 400 मदतीचे ट्रक गाझा पट्टीमध्ये प्रवेश करतील, आणि त्यानंतरच्या दिवसांमध्ये ही संख्या वाढवली जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande