पंजाबमध्ये बब्बर खालसा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक
चंडीगड, ९ ऑक्टोबर (हिं.स.) पंजाब पोलिसांनी सणासुदीच्या काळात आखण्यात आलेल्या मोठ्या हल्ल्याचा कट उधळून लावत बब्बर खालसा या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून अडीच किलो आरडीएक्स जप्त करण्यात आले आहे. पंजाब पोलिसांचे महासंचालक
पंजाब पोलिसांनी जप्त केलेली स्फोटके


चंडीगड, ९ ऑक्टोबर (हिं.स.) पंजाब पोलिसांनी सणासुदीच्या काळात आखण्यात आलेल्या मोठ्या हल्ल्याचा कट उधळून लावत बब्बर खालसा या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून अडीच किलो आरडीएक्स जप्त करण्यात आले आहे.

पंजाब पोलिसांचे महासंचालक गौरव यादव यांनी गुरुवारी सांगितले की, पंजाब पोलिसांच्या काउंटर इंटेलिजेंस टीमने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयच्या पाठिंब्याने समर्थित बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेच्या एका मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि गुरजिंदर सिंग आणि दिवान सिंग यांना अटक केली. हे नेटवर्क यूकेस्थित हँडलर निशान आणि आदेश यांच्यामार्फत कार्यरत होते. ज्यांना बीकेआयचा मास्टरमाइंड हरविंदर सिंग रिंडा यांच्याकडून सूचना मिळत होत्या.डीजीपींच्या मते, पोलिसांनी स्फोटके जप्त केली आहेत आणि तपास सुरू केला आहे. ही स्फोटके आयएसआय समर्थित दहशतवाद्यांनी पाठवली होती. तपासात असे दिसून आले आहे की, ही स्फोटके मोठ्या दहशतवादी हल्ल्यात वापरण्यासाठी होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande