नांदेड येथे 14 ऑक्टोबर रोजी पेन्शन अदालत
नांदेड, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।शासनाच्या सूचनेनुसार माहे ऑक्टोबर २०२५ मधील दुसऱ्या मंगळवारी, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५, रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पेन्शन अदालात आयोजित करण्यात आली आहे. सदर अदालातासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी ११ ते दु
नांदेड येथे 14 ऑक्टोबर रोजी पेन्शन अदालत


नांदेड, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।शासनाच्या सूचनेनुसार माहे ऑक्टोबर २०२५ मधील दुसऱ्या मंगळवारी, दिनांक १४ ऑक्टोबर २०२५, रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे पेन्शन अदालात आयोजित करण्यात आली आहे.

सदर अदालातासाठी अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी ११ ते दुपारी १:३० वाजेपर्यंत हजर राहावे.नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्‍यांनी पेन्शन संबंधित अडचणी, तक्रारी व मागण्या सदर दिवशी हजर राहून सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande