लातूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांचा चाबूक
लातूर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। लातूर शहरात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दोन आरसीपी प्लाटूनसह अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करू
लातूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांचा चाबूक


लातूर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। लातूर शहरात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दोन आरसीपी प्लाटूनसह अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे.

शहरात अॅटोरिक्षांची संख्या प्रमाणाबाहेर वाढल्याने अनेक चालक सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहेत. चालक फ्रंटशिटला प्रवासी घेतात, गणवेश परिधान करत नाहीत, चौकात दुहेरी रांग लावून रिक्षा थांबवतात, तसेच कोठेही प्रवासी चढ-उतार करतात. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वात कारवाई सुरू आहे.

मोहीमेतील प्रमुख कारवाया

बेशिस्त अॅटोरिक्षाचालकांवर दररोज केसेस नोंदवून ई-चलानद्वारे दंड वसूल केला जात आहे.

आतापर्यंत १६७ अॅटोचालकांवर कारवाई करून ₹१,१८,६५० दंड आकारला आहे.

४७ ओव्हरस्पीड केसेस — एकूण ₹९४,००० दंड वसूल.

बिना परमीट अॅटो चालकांवर खटले दाखल, न्यायालयीन प्रक्रिया सुरू.

मुख्य चौकात नो स्टॉपिंग क्षेत्रात बेशिस्त थांबणाऱ्यांवर कलम २८५ अंतर्गत गुन्हे दाखल.

वाहन चालवताना मोबाईलवर बोलणारे, ट्रिपल सीट प्रवासी, विना कागदपत्र, मोठा आवाज करणारे सायलन्सर, तसेच हेल्मेटशिवाय वाहन चालवणाऱ्यांवरही कारवाई सुरू आहे.

पोलिसांचे आवाहन

अॅटोरिक्षाचालकांनी व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे

फ्रंटशिटवर प्रवासी घेऊ नये, गणवेश घालावा, ठरलेल्या ठिकाणीच प्रवासी चढ-उतार करावेत, व नो स्टॉपिंग/नो पार्किंग झोनमध्ये वाहन थांबवू नये.

अन्यथा नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande