परभणी, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। येथील बाल विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सिंधू शर्मा यांना महाराष्ट्र कला अध्यापक संघातर्फे कला भूषण हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र कला अध्यापक व राज्य ऋतुरंग स्पर्धेत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देऊन सहभाग नोंदवल्याबद्दल प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सिंधू शर्मा यांचा बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर यांनी सन्मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी बाल विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण बोराडे, वैभव नगर शाखेचे विभाग प्रमुख प्रदीप रुघे , कलाध्यापक लगड तथा इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis