ठाणे, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडील असाधारण राजपत्र, दि.9 सप्टेंबर 2025 अन्वये, राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अध्यक्ष व सभापतीपदाचे आरक्षण अधिसूचना पारित केलेली आहे.
या अधिसूचनेनुसार, ठाणे जिल्ह्यातील पंचायत समिती शहापूर / मुरबाड / कल्याण / भिवंडी /अंबरनाथ सभापती पदाची आरक्षण सोडत सभा आज जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन सभागृह, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे पार पडली.
पंचायत समिती शहापूर / मुरबाड/ कल्याण / भिवंडी /अंबरनाथ सभापती पदाचे पुढील अडीच वर्षासाठी खालील प्रमाणे आरक्षण सोडतीद्वारे जाहीर करण्यात आले आहे.
पंचायत समितीचे नाव:- शहापूर, सभापती आरक्षण:- अनुसूचित जमाती (महिला)
पंचायत समितीचे नाव:- मुरबाड, सभापती आरक्षण:- सर्वसाधारण
पंचायत समितीचे नाव:- कल्याण, सभापती आरक्षण:- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
पंचायत समितीचे नाव:- भिवंडी, सभापती आरक्षण:- अनुसूचित जमाती (महिला)
पंचायत समितीचे नाव:- अंबरनाथ, सभापती आरक्षण:- सर्वसाधारण (महिला)
या सभेस उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रुपाली भालके, तहसिलदार (सर्वसाधारण) सचिन चौधर, ठाणे जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर