रत्नागिरी : रोजगाराभिुख अल्पमुदत अभ्यासक्रमांचे उद्घाटन
रत्नागिरी, 9 ऑक्टोबर, (हिं. स.) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये नव्या युगातील व रोजगारक्षम अभ्यासक्रमांचा प्रारंभ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील संस्थेचा त्यात समावेश होता
रत्नागिरी : रोजगाराभिुख अल्पमुदत अभ्यासक्रमांचे उद्घाटन


रत्नागिरी, 9 ऑक्टोबर, (हिं. स.) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये नव्या युगातील व रोजगारक्षम अभ्यासक्रमांचा प्रारंभ काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील संस्थेचा त्यात समावेश होता.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संगमेश्वर येथे असोसिएट इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री), सुईग मशीन ऑपरेटर (टेलरिंग), प्लंबर जनरल (नळ कारागीर), फोर व्हीलर सर्व्हिस असिस्टंट (चारचाकी वाहन दुरुस्ती) हे रोजगाराभिमुख अल्पमुदत अभ्यासक्रम चालू करण्यात आले. शासनाच्या सूचनेनुसार संस्था स्तरावर या अभ्यासक्रमाचे उद्घाटन दिगंबर सोमलिंग लिंगायत (विश्वकर्मा लाभार्थी) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपसरपंच नावडी विवेक शेरे यांनी भूषविले. सूत्रसंचालन समीर पाणिंद्रे (शिल्पनिदेशक विजतंत्री) यांनी केले. संस्थेचे प्र. प्राचार्य अश्रफ मुल्ला, आय. एम. सी सदस्य कमलाकर मसुरकर, संस्थेतील निदेशक वर्ग, सर्व कर्मचारी वृंद, सर्व प्रशिक्षणार्थी, अन्य विद्यालयातील विद्यार्थी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande