मतदार यादी हरकतींवर निर्णयासाठी तहसीलदार प्राधिकृत
अकोला, 9 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मतदार यादीवरील हरकती व आक्षेप तहसील स्तरावर स्वीकारले जातात. प्राप्त हरकती व सूचनांवर निर्णय घेण्यासाठी तहसीलदारांना प्राधिकृत करण्य
मतदार यादी हरकतींवर निर्णयासाठी तहसीलदार प्राधिकृत


अकोला, 9 ऑक्टोबर (हिं.स.)

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मतदार यादीवरील हरकती व आक्षेप तहसील स्तरावर स्वीकारले जातात. प्राप्त हरकती व सूचनांवर निर्णय घेण्यासाठी तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी निर्गमित केला. मतदार यादी सुरक्षितरीत्या ताब्यात ठेवणे, प्रारूप मतदार यादीसंदर्भात प्राप्त हरकती व सूचनांवर निर्णय घेण्यासाठी संबंधित पंचायत समिती क्षेत्रनिहाय त्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande