परभणी, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची ३९० वी जयंती मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम माजी उपमहापौर भगवान दादा वाघमारे यांच्या कार्यालयात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात वीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली.
यावेळी भगवान वाघमारे आणि प्रकाश महाराज कंठाळे यांनी जिवाजी महाले यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करून सांगितले की “वीर जिवाजी महाले यांच्या पराक्रमामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचले. त्यांचे बलिदान हे स्वराज्याच्या इतिहासातील सुवर्ण पान आहे.”
या कार्यक्रमाला महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष संपतराव सवणे, गणेशराव गुंगे, गणेश वाघमारे, प्रभू दीपके, मोईन भाई, आत्माराम प्रधान, आत्माराम राऊत, श्याम साखरे, केशव कंकाळ, संतोष जाधव, वसंत पारवे, दगडू राऊत, गोविंद भालेराव, बालाजी कंठाळे, संतोष वाघमारे, ज्ञानेश्वर राऊत, सुनील भालेराव, विलास भुसारे, सुभाष राऊत तसेच इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis