
मुंबई, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। देशांतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज ब्रँड लावानं आपला पहिला नेकबँड-स्टाइल वायरलेस ईयरफोन्स ‘प्रोबड्स एन33’ भारतीय बाजारात सादर केला आहे. फक्त 1,299 रुपयांच्या आकर्षक किंमतीत उपलब्ध असलेला हा नेकबँड अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (एएनसी), 40 तासांपर्यंत प्लेबॅक, 45 मिलिसेकंद लो-लॅटन्सी आणि ब्लूटूथ 5.4 कनेक्टिव्हिटीसारख्या प्रीमियम वैशिष्ट्यांसह येतो.
लावा प्रोबड्स एन33 हा कंपनीचा पहिलाच एएनसी तंत्रज्ञानासह सुसज्ज नेकबँड आहे. 30 डेसिबलपर्यंत बाहेरील आवाज कमी करणारी एएनसी सुविधा प्रवास, ऑफिस किंवा जिमसारख्या ठिकाणी अधिक चांगला ऑडिओ अनुभव देते. तसेच, एन्व्हायर्नमेंटल नॉइज कॅन्सलेशन (ईएनसी) कॉल्सदरम्यान स्वच्छ आवाज देतं, तर ट्रान्स्परन्सी मोडमुळे गरजेनुसार बाहेरील आवाज ऐकण्याचीही सोय मिळते. ड्युअल डिव्हाइस पेअरिंग फीचरमुळे एकाच वेळी दोन उपकरणांशी कनेक्ट होता येतं.
साउंड क्वालिटीच्या दृष्टीने 13 मिमी बास ड्रायव्हर्स डीप बास आणि बॅलन्स्ड साउंड देतात. गेमर्ससाठी प्रो गेम मोडमध्ये दिलेली 45 मिलिसेकंद लो-लॅटन्सी मोबाइल गेमिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगदरम्यान ऑडिओ-सिंकमध्ये कोणताही अडथळा येऊ देत नाही. मेटॅलिक फिनिश, मॅग्नेटिक ईयरबड्स आणि लवचिक नेकबँड डिझाइनमुळे हा उत्पादन स्टाइलिश आणि वापरण्यास सोयीचा ठरतो.
बॅटरीच्या बाबतीत, यात 300 mAh क्षमतेची बॅटरी असून एएनसी बंद असताना 40 तासांचा आणि एएनसी सुरू असताना 31 तासांचा प्लेबॅक वेळ मिळतो. फास्ट चार्जिंग सपोर्टमुळे फक्त 10 मिनिटांच्या चार्जमध्ये 10 तासांपर्यंत वापर शक्य आहे, तर पूर्ण चार्जसाठी फक्त 1 तास लागतो. टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि IPX5 वॉटर-रेझिस्टंट रेटिंगमुळे हा नेकबँड व्यायाम, प्रवास आणि पावसाळी हवामानातही उपयुक्त ठरतो.
लावा प्रोबड्स एन33 मध्ये इन-लाइन चार बटन्स दिले असून कॉल, म्युझिक आणि व्हॉल्यूम नियंत्रण सहज करता येते. हा नेकबँड लावा ई-स्टोअर आणि निवडक रिटेल स्टोअर्सवर 31 ऑक्टोबरपासून विक्रीस उपलब्ध आहे. ऑब्सिडियन ब्लॅक आणि कॉस्मिक टील ग्रीन या दोन रंग पर्यायांमध्ये सादर करण्यात आलेला लावा प्रोबड्स एन33 बजेट सेगमेंटमधील एएनसी-सक्षम नेकबँड म्हणून गेमर्स, म्युझिकप्रेमी आणि दैनंदिन वापरकर्त्यांसाठी एक आकर्षक आणि टिकाऊ पर्याय ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule