सोने दरात अचानक मोठी उसळी
जळगाव, 31 ऑक्टोबर (हिं.स.)मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात मोठी घसरण झाली. मात्र आज शुक्रवारी सोने दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,२०० रुपयांनी वाढले आहेत. मात्र दुसरीकडे चांदी दरात कोणतीही दरवाढ अथवा घसरण झाली
संग्रहित


जळगाव, 31 ऑक्टोबर (हिं.स.)मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात मोठी घसरण झाली. मात्र आज शुक्रवारी सोने दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,२०० रुपयांनी वाढले आहेत. मात्र दुसरीकडे चांदी दरात कोणतीही दरवाढ अथवा घसरण झाली नाही. चांदीचे दर जैसे थे आहेत.

दिवाळीनंतर लवकरच लग्नसराईचा काळ सुरु होणार असून त्यापूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली. सोन्याचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांचा सोनं खरेदीकडे कल वाढला होता. ते आणखी सोन्याचे दर कमी होण्याची वाट पाहत होते. पण आज सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,२०० रुपयांनी वाढले आहेत. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,२२,२६० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,१०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१२,४५० रुपये मोजावे लागणार आहे. १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील चांगलीच वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ९०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला ९२,०१० रुपये खर्च करावे लागणार आहेत. दरम्यान आज सोन्याच्या दरात वाढ झाली असली तर चांदीच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. चांदीचे दर जैसे थे आहेत. आज १ किलो चांदीचे दर १,५१,००० रुपये इतका आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande