हरियाणात 300 किलो आरडीएक्स जप्त
फरीदाबाद, 10 नोव्हेंबर (हिं.स.) : हरियाणातील फरीदाबादमध्ये जम्मू-कश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. फरीदाबादच्या धौज परिसरातील एका डॉक्टरच्या घरातून मोठ्या प्रमाणात आरडीएक्स सापडले आहे. पोलिसांनी 12 पिशव्यांमध्ये ठेवलेले आरडीएक्स, 2 ऑटोमॅटिक पि
प्रतिकात्मक फोटो


फरीदाबाद, 10 नोव्हेंबर (हिं.स.) : हरियाणातील फरीदाबादमध्ये जम्मू-कश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. फरीदाबादच्या धौज परिसरातील एका डॉक्टरच्या घरातून मोठ्या प्रमाणात आरडीएक्स सापडले आहे. पोलिसांनी 12 पिशव्यांमध्ये ठेवलेले आरडीएक्स, 2 ऑटोमॅटिक पिस्तुल, 84 काडतुसे, 5 लिटर रासायनिक पदार्थ आणि एक एके-56 रायफल जप्त केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण धौज परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला दहशतवादी मुजाहिल शकीलच्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपीला जम्मू-कश्मीर पोलिसांनी 2 दिवसांपूर्वी अटक केली होती. चौकशीत आरोपी डॉक्टरच्या माहितीवरून पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला. या छाप्यातून 12 पिशव्या आरडीएक्स, दोन ऑटोमॅटिक पिस्तुल, 84 काडतुसे, पाच लिटर केमिकल आणि एक एके-56 रायफल सापडली आहे.सुरक्षा यंत्रणांसाठी ही जप्ती गंभीर चिंतेचा विषय बनली आहे, कारण आरडीएक्स हा अत्यंत शक्तिशाली स्फोटक पदार्थ आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तो मिळाल्याने कुठल्यातरी मोठ्या कटाची किंवा धोक्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande