भुसावळ मार्गे मुंबई-छपरा दरम्यान ६ अतिरिक्त विशेष गाड्या
जळगाव, 10 नोव्हेंबर (हिं.स.) दिवाळीनंतर आता परतीच्या प्रवासाला लागलेल्या प्रवाशांमुळे भुसावळ मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई आणि
रेल्वे लोगो


जळगाव, 10 नोव्हेंबर (हिं.स.) दिवाळीनंतर आता परतीच्या प्रवासाला लागलेल्या प्रवाशांमुळे भुसावळ मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई आणि छपरा दरम्यान ६ अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. विशेष या गाड्या भुसावळ मार्गे धावणार असल्यानं भुसावळकर प्रवाशांची सोय झाली आहे.

गाडी क्रमांक ०५०९४ विशेष गाडी मंगळवारी (दि.११) एलटीटी येथून ३.५५ वाजता सुटेल. छपरा येथे तिसऱ्या दिवशी १.४५ वाजता पोहोचेल. ०५०९३ क्रमांकाची गाडी येथून सुटली. ती मंगळवारी १.४० वाजता एलटीटीला पोहोचेल. ०५०९६ गाडी १२ रोजी एटीटी येथून ३.५५ वाजता सुटून छपरा येथे तिसऱ्या दिवशी १.४५ वाजता पोहोचेल. ०५०९५ क्रमांकाची गाडी सोमवारी (दि.१०) छपरा येथून १०.४५ वाजता निघेल.एलटीटीला तिसऱ्या दिवशी १.४० वाजता पोहोचेल. ०५०९८ क्रमांकाची गाडी गुरुवारी (दि.१३) रोजी एलटीटी येथून ३.५५ वाजता सुटेल. छपरा येथे तिसऱ्या दिवशी १.४५ वाजता पोहोचेल. ०५०९७ क्रमांकाची गाडी मंगळवारी (दि.११) छपरा येथून १०.४५ वाजता निघून तिसऱ्या दिवशी १.४० वाजता एलटीटीला येईल. वरील गाड्यांना कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी या विभागातील स्थानकांवर थांबे मंजूर आहे. आरक्षणदेखील सुरू झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande