अमेरिकेत तीन दिवसांत ६ हजारांहून अधिक उड्डाणे रद्द
- न्यूयॉर्कसह चार विमानतळांवर सर्वाधिक परिणाम वॉशिंग्टन , 10 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेत सुरू असलेल्या सरकारी शटडाउनचा परिणाम आता सामान्य नागरिकांवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. देशातील विमानतळांवर प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे
अमेरिकेत तीन दिवसांत ६,००० हून अधिक उड्डाणे रद्द


- न्यूयॉर्कसह चार विमानतळांवर सर्वाधिक परिणाम

वॉशिंग्टन , 10 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेत सुरू असलेल्या सरकारी शटडाउनचा परिणाम आता सामान्य नागरिकांवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. देशातील विमानतळांवर प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे, कारण अनेक उड्डाणे रद्द केली जात आहेत किंवा तासांनं उशीराने चालत आहेत. शनिवारी अमेरिकन एअरलाइन्सने 1500 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द केल्याची माहिती दिली, तर रविवारी ही संख्या सुमारे 2900 पर्यंत पोहोचली. हा निर्णय अमेरिकी विमानन नियामक संस्था एफएएच्या आदेशानुसार घेण्यात आला आहे. स्टाफच्या कमतरतेमुळे उड्डाणांची संख्या कमी करावी लागली आहे.

सोमवारी सकाळपर्यंत 1600 उड्डाणे रद्द करण्यात आली असून, मंगळवारी जवळजवळ 1000 उड्डाणे आधीच रद्द घोषित करण्यात आली आहेत. एफएए ने सांगितले की या आठवड्याच्या अखेरीस उड्डाणांमध्ये 10% पर्यंत कपात करावी लागू शकते, जेणेकरून कमी स्टाफ असूनही सुरक्षा सुनिश्चित करता येईल. आतापर्यंत शनिवारी-रविवारी 4% कपात करण्यात आली होती, तर मंगळवारी ही 6% होणार आहे.

परिवहन मंत्री शॉन डफी यांनी इशारा दिला आहे की, जर परिस्थिती सुधारली नाही, तर उड्डाणांमध्ये 20% पर्यंत अधिक कपात करावी लागू शकते. ते म्हणाले, “दररोज अधिक कंट्रोलर्स कामावर येत नाहीत कारण त्यांना पगार मिळत नाही.” डफी यांनी स्वीकारले की सरकार पूर्वीच एटीसी च्या कमतरतेशी झुंज देत होती आणि आता शटडाउनमुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. अनेक वरिष्ठ कंट्रोलर्सने आपल्या निवृत्तीची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली आहे. न्यूयॉर्क, ऑर्लँडो, शिकागो आणि डेट्रॉइटसारख्या मोठ्या विमानतळांवर उड्डाणांमध्ये एक तासांहून अधिक उशीर होत आहे आणि परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे.

तज्ञांचे म्हणणे आहे की, जरी काँग्रेस येत्या काळात एखाद्या करारावर पोहोचली, तरी परिस्थिती पूर्णपणे सामान्य होण्यासाठी काही वेळ लागेल. जर शटडाउन लवकर संपले नाही, तर थँक्सगिव्हिंग हॉलिडे सप्ताहापर्यंत अमेरिकेत हवाई प्रवास खूपच मर्यादित होऊ शकतो. सरकारच्या बंदीमुळे फक्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीवरच परिणाम होत नाही, तर प्रवाशांनाही रद्द उड्डाणे, उशीर आणि गर्दीच्या विमानतळांमुळे थेट त्रास सहन करावा लागत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande