ऍपलनं आयफोन एअर 2 चं लॉंचिंग पुढं ढकललं; आता 2027 मध्ये येणार नवा मॉडेल
मुंबई, 11 नोव्हेंबर (हिं.स.)। ऍपलनं आपल्या अत्यंत प्रतीक्षित आयफोन एअर 2 च्या लाँचिंगमध्ये विलंब केल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला सप्टेंबर 2026 मध्ये आयफोन 18 सिरीजसोबत हा स्मार्टफोन सादर होणार होता, मात्र आता त्याचं लॉंचिंग वसंत ऋतू 2027 प
iPhone Air 2


मुंबई, 11 नोव्हेंबर (हिं.स.)। ऍपलनं आपल्या अत्यंत प्रतीक्षित आयफोन एअर 2 च्या लाँचिंगमध्ये विलंब केल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला सप्टेंबर 2026 मध्ये आयफोन 18 सिरीजसोबत हा स्मार्टफोन सादर होणार होता, मात्र आता त्याचं लॉंचिंग वसंत ऋतू 2027 पर्यंत पुढं ढकलण्यात आलं आहे. कंपनीनं आपलं लक्ष आयफोन 18 लाइनअप आणि पहिल्या फोल्डेबल आयफोनकडे केंद्रित केलं असून, या निर्णयामुळे अ‍ॅपलच्या भविष्यातील धोरण आणि प्राथमिकतांबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

‘द इन्फॉर्मेशन’च्या अहवालानुसार, अ‍ॅपलनं सध्याच्या आयफोन एअर मॉडेलचं उत्पादन कमी केलं आहे. या मॉडेलला बाजारात अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे आयफोन एअर 2 चं लॉंचिंग पुढं ढकलण्यात आल्याचं सांगितलं जातं. तज्ज्ञांच्या मते, कंपनी आता आपल्या फ्लॅगशिप मॉडेल्सवर जास्त भर देत आहे. 2026 च्या इव्हेंटमध्ये फक्त दोन प्रमुख उत्पादनं – आयफोन 18 सिरीज आणि दीर्घकाळापासून प्रतीक्षित आयफोन फोल्ड – सादर केली जातील. आयफोन 18 मध्ये अपग्रेडेड प्रोसेसर, सुधारित कॅमेरा सिस्टम आणि एआय-आधारित फीचर्स असतील, तर आयफोन फोल्ड हा अ‍ॅपलचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन असेल, जो सॅमसंग आणि गुगलच्या मॉडेल्सना टक्कर देईल.

आयफोन एअर 2 च्या संभाव्य वैशिष्ट्यांबाबत विविध लीक समोर आले आहेत. हा स्मार्टफोन हलका चॅसिस, मोठी बॅटरी क्षमता आणि व्हॅपर चेंबर कूलिंग सिस्टमसह येणार असल्याचं सांगितलं जातं. यामुळं वापरकर्त्यांना दीर्घकाळ वापरातही ओव्हरहीटिंगची समस्या भासणार नाही. कॅमेरा विभागातही सुधारणा होणार असून, 48 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेन्स असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे.

या विलंबामागे विक्रीतील घट तसेच वाढती बाजारातील स्पर्धा ही प्रमुख कारणं असल्याचं मानलं जातं. शाओमी, व्हिवो आणि इतर चीनी ब्रँड्सनी मध्यम श्रेणीतील ग्राहकांसाठी किफायतशीर पर्याय उपलब्ध करून दिल्यामुळे आयफोन एअरला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे अ‍ॅपल आता प्रीमियम सेगमेंटवर लक्ष केंद्रीत करत असल्याचं दिसतं. लीक अहवालांनुसार, आयफोन एअर 2 मध्ये एम सीरीज चिप असणार आहे, जी मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी विशेषतः ऑप्टिमाइझ्ड असेल. डिस्प्ले विभागात उच्च ब्राइटनेस आणि हाय रिफ्रेश रेट मिळेल, तसेच हा फोन अ‍ॅपलच्या इकोसिस्टमशी अधिक सुसंगत असेल. या सर्व अपग्रेड्समुळे आयफोन एअर 2 2027 मध्ये लॉंच झाल्यावर अ‍ॅपलच्या उत्पादन मालिकेत महत्त्वाचं स्थान मिळवू शकतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande